बुधवार, २९ जुलै, २०१५

भूत आले भुत

आयुष्यात बरे, वाईट, कडु-गोड, आंबट-तुरट असे नाना प्रकारचे अनुभव प्रत्येकाच्याच वाट्याला येतात.त्याबरोबरच काही कडु-गोड, आंबट-तुरट लोकही भेटतात. काही लोकं आपल्या लक्षात राहतात तर काही प्रसंग! अशीच एक व्यक्ती माझ्या स्मरणात राहिलेली.त्यावर्षी कराडच्या गव्हर्नमेंट कॉलेज मधून फ़ायनलची परीक्षा देऊन सुट्टीत मी घरी आलो होतो. उन्हाळा आपला दर वर्षीच्या उन्हाळ्यासारखाच जात होता. माझ्या चुलत मामांचा सुधीर आमच्याकडे राहायला आला होता. त्यामुळं मलाही एक बिनपगारी नोकर मिळाला होता आणि तोही इंजिनियर दादाच्या कृपाछत्राखाली बर्याच नवीन आणि अजब गोष्टी शिकत होता. सकाळी खिडकीतून उन्हं माझ्या गादीवर येईपर्यंत मी उठत नव्हते. आईही आपली पोराला तिथं बराच अभ्यास असतोय हो म्हणून मला वाटेल तितका वेळ झोपून देत होती, त्यानंतर भरपूर जेवण आणि नंतर चौकात किशाच्या पानपट्टीवर वेळ घालवायचा. दिवसकसे मजेत चालले होते. मध्ये अधे परीक्षेच्या रिझल्टची आठवण व्हायची आणि छाती धडधडायला लागायची. पण याव्यतिरिक्त ग़ावातली कोणती मुलगी कोणत्या कॉलेजला जाते, कुणाचं कुणाबरोबर लफ़डं आहे याचं चर्वण करण्यात वेळ कसा जात होता तेही समजत नव्हतं. आणि माझ्यासाठी अजुन एक गोड कारण होते. गावातल्या कुलकर्णी मास्तरांची गोरीपान मुग्धा, मागच्या आठवड्यात रस्त्यावर दोनदा थांबून माझ्याशी बोलली होती, त्या एका वेगळ्याच धुंदीत मी होतो.त्यादिवशीही तिची वाट पहात मी टपरीवर पडून होतो. गप्पांत वेळ कसा गेला कळलाच नाही. आणि जेव्हा मीघड्याळात पाहिलं तेव्हा ४ वाजत आले होते. आयला! आज मला सुधर्याला सोडायला माळेवाडीला जायचं होतं,आणि लगेच परतायचे होते. उद्या माझ्या मित्राच्या बहिणीचं वर्हाड गावातनं सकाळी सात वाजता निघणार होतं, त्यामुळं तिथं मुक्कामही करता येणार नव्हता.भानावर आल्यावर, टाचणीने पृष्ठभागावर टोचल्यासारखा, मी घरी पळत सुटलो."चल चल सुधर्या, झालं का तुझं?"पटापट पिशवीत त्याचे कपडे कोंबून मी त्याला ढकलतच घराबाहेर काढला."बाबा, गाडीची चावी कुठाय?" उंबर्यातनं मी बाबांना हाक दिली.'अरे मोटरसायकल नेऊ नकोस, मध्येच बंद पडते ती आजकाल' आतून बाबांचा आवाज आला. छ्छ्या गाडी असताना एस. टी. ने प्रवास करायचा म्हणजे! काहीतरीच काय!'एस. टी. नं घेऊन जा त्याला' बाहेर येत आई म्हणाली. तेवढ्यात समोरच्या टेबलावर मला चावी दिसली, ती घेऊन आईनं अजून अडविण्याआधीच मी गाडीला कीक मारली.माळेवाडी आमच्या गावापासून दीड तासावर होतं. गेल्यावर मामींनी चुळ भरायला पाणी दिलं, चहा ठेवला. चहा पिऊन निघावं असा माझा बेत होता. तेवढ्यात मामा आले. आमचे मामा म्हणजे अजब वल्ली आहेत. मिलिटरीतून रिटायर झाल्यावर, गावी शेती करायला येऊन राहिले. घरात आल्या आल्या मला बघून त्यांचा चेहरा खुलला. त्यांना माझं खूप कौतुक! दहावी-बारावीला एवढे मार्क्स पाडुन इंजिनियरींगला अडमिशन मिळवल्याबद्दल! त्यामुळं आमच्या नावाचा सुधर्यासमोर सारखा शंख असे. माझ्या शेजारी बसलेल्या सुधर्याच्या पाठीवर मोठ्यानं थाप टाकून त्यांनी विचारलं,"काय शिकलास का मग अरूणकडून?" मी फ़क्ककन हसलो. तो माझ्याकडुन काय काय शिकला, हे जर त्यानं सांगितलं, तर कदाचित मला इथं यायची कायमची बंदी होईल. सुधीरन हसून वेळ घालवली. पोरगं हुशार आहे!"बघु पुढच्यावर्षी दहावीत काय दिवे लावतोय." त्याला टोला पडलाच.थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी मामांना म्हणालो."मामा, मला आता निघायला पाहिजे. उद्या सकाळी लवकर निघायचंय""छे! छे! आता कुठ जातोयस? इथंच रहा आज. कोंबडी-बिबंडी कापूया... काय म्हणतोस मग?" मिस्किलपणेहसत उभं राहत ते म्हणाले."नाही मामा मला खरचं जायला पाहिजे" मी उठलो."उद्या सकाळी सात वाजता मला एका लग्नाला निघायचंय. माझ्या मित्राच्या बहिणीचं वर्हाड गावातनं निघणार आहे." यावर मामांनी दहा मिनिटे भाषण दिले. पाहुण्यारावळ्यांकडे कसे आले गेले पाहिजे, त्यामुळे आपुलकी कशी वाढते वगैरे वगैरे. तरी माझा जायचा ठाम निर्धार बघुन वैतागुन ते म्हणाले,"ठिक आहे जायच असेल तर जा. पण थोडा उशीरा गेलास तर काही बिघडणार नाही. जेवल्याशिवाय काही जाऊ नकोस." असे म्हणून ते बाहेर निघून गेले.सुधर्याला मी खूण केली 'कुठं?' म्हणून, तर त्याने एका हातावर सुर्यासारखा दुसरा हात घासून सांकेतिक भाषेत उत्तर दिलं. त्याच अर्थ कळायला मला जास्त वेळ काही लागला नाही. पाचच मिनिटात मामातंगडीला धरून कोंबडी घेऊन घरात आले. कोंबडीसारखी मान टाकून, मी ही मग विरोध करायचा बंद केला. मामांनी कोंबडी साफ करून आत मामींकडे दिली आणि मानेनं खूण करून मला आत बोलवलं. मी ही देवाला चढवायला निघालेल्या बोकडासारखा त्यांच्या पाठी गेलो. आत कपाटातनं व्हिस्कीची बाटली काढून डोळे मिचकावून त्यांनी मला विचारलं,"पितोस का?"चार लोकांसमोर माझी पॅंट खाली ओढल्यासारखा मी बावरलो."छे! छे! " मी मुंडी हलवली, माझी परीक्षा घेतायत की काय?"खोटं बोलू नकोस." बाटलीचं टोपण उघडत मिस्किलपणे हसत ते म्हणाले."खरंच नाही मामा. मी खरंच व्हिस्की कधी नाही पिली." मी काकुळतीला आलो.आणि ते खरंही होतं. व्हिस्की कुणाच्या बापाला परवडणार आहे? कॉलेजमध्ये २-३ दा बीयर घेतली असेल तेवढीच."मग काय पिलीस?" आयला ! माझं मन वाचता येतं की काय त्यांना?"बीयर?""हो पण एकदाच." मी ठोकून दिलं.तेवढ्यात सुधीर आत डोकावला, त्याला पहाताच "हितं काय काम आहे तुझं" म्हणत ते त्याच्यावर खेकसले.त्याच्या पाठी मी ही सटकलो.जेवण तयार व्हायला आठ वाजलेच. तोपर्यंत मामा चांगलेच तालात आले होते."मग कसा आलास येताना?" त्यांनी विचारलं."बारामती मार्गे" मी म्हणालो."आता अंधारात मला जाव लागेल" थोड्यावेळानं मी तक्रार केली."मग कशाला जातोस. रहा इथं"पून्हा चर्चा पूर्वपदावर गेल्यानं मी काही बोललो नाही."अंधारात गाडी चालवणं खूप खतरनाक असतं हं! लोकांना खूप वाईट अनुभव आलेत या भागात." त्यांनी सुरूवात केली."कसले अनुभव?" अनवधानाने मी विचारलं."थांब तुला मी एक किस्सा सांगतो." स्वत:च्या मांडीवर जोरानं थाप मारत ते म्हणाले."मी आणि तो आपला बाळू गवंडी, अरे आपल्या आज्याचा बाप? " माझ्या मांडीला स्पर्श करत ते म्हणाले."मला नाही माहीत" मी खांदे उडवले. आता ह्यांचा अज्या मला कसा माहित असेल?"अरे त्यानंच तर हे घर बांधलंय. गावात पहिली स्लॅबची इमारत आहे आपली!" छाती ठोकून ते म्हणाले."तुला माहीत असेल की?" सुधीरकडे वळून ते म्हणाले. "अरे तो नाही का, स्टॅंडवर दारू पिऊन पडलेला असतो दररोज?""हो माहिताय मला तो. कसलं पेदाड आहे ते! त्याला दोनदा अज्यान गटारातनं काढला." चिरंजिवांनी री ओढली."हा-हा" बोटानं दोनदा नाही ची खुण करत पुढे झुकत ते म्हणाले."त्याच्या पिण्यावर जाऊ नकोस आता, माणूस लय चांगला होता" गवयाच्या गाण्यावर दाद देताना हवेत हातफिरवावा, तसा हात फिरवून ते आता माझ्याकडे वळले."नाही.. मी खोटं नाही सांगत, अगदी खरं आहे. कुणालाही विचार हवं तर" आता मला काय करायचय त्या बाळू गवंड्याशी? तो पूर्वजन्मी प्रत्यक्ष देवाचा अवतार असला तरी मला काय देणं घेणं!"अगदी देवासारखा होता" मामांनी सुरू केलं. आयला परत मनातलं ओळखलं!"पण त्याच्या बापानं मरताना सगळा जमिनजुमला धाकट्याच्या नावानं केला, तेव्हापासून असंच फिरत असतंय""पक्क वाया गेलयं" मामांच्या तोंडात आता गावची भाषा यायला लागली.त्यांची गाडी पूर्ववत रुळावर आणावी म्हणून मी विचारलं. "मग तुमच्या किस्स्याचं पुढं काय झालं?""आरे हो ! तुला किस्सा सांगत होतो ना?""तर मी आणि बाळू गवंडी. बर का? असंच एकदा बारामतीला पिक्चर बघायला गेलो, सायकलवरनं गेलो होतो आपलं! " मी हुंकार भरला "पिक्चर संपला बारा-साडे बाराच्या दरम्यान बर का? आणि आम्ही आपले निघालोय माळेवाडीला परत""तो रस्त्यात पुल लागतो बघ?" त्यांनी पून्हा मला विचारलं.मी पुन्हा हुंकारलो, मुंडी हलवली."किती पाणी होतं रे त्या ओढ्यात आत्ता येताना?" गाडी परत रुळावरुन घसरली होती."होतं थोडफार. जास्त काही नव्हतं" अगम्य भाषेत मी उत्तर दिलं."बरोब्बर!" पण त्यांना उत्तर कळलेलं दिसत होते."तर त्यादिवशीही तेवढच पाणी असेल नसेल, आम्ही जाताना पाणी पुलाखाली होतं बरं का?""बरं" मी म्हणालो."आणि येताना आम्ही पुल ओलांडतोय." इथं ते थांबले. प्रसंगाचे वर्णन कमी पडलं त्यांच्या लक्षात आलं. माझ्या मांडीवर बोटं टेकवून ते म्हणाले."किर्र अंधार होता, रस्त्यावर कुणी सुद्धा नव्हतं, आम्ही आपलं निवांत चाललोय. आता दोघजण होतो म्हणून कसली भीती. बरोबर?"बरोबर" मी म्हणालो."तर रात्रीच्या साडेबारा वाजता पुलावर आलो आम्ही. पुल ओलांडतोय तर अचानक हे ऽ ऽ धबधब्यासारखं पाणी आलं वरुन! बाळू लागला ओरडायला..""तो सायकल चालवत होता, मी पाठीमागे बसलोवतो, बरं का?" मध्येच माझ्याकडे पहात त्यांनी खुलासा केला."हं हं" मी समजल्यासारखी मुंडी हलवली, पुढे सांगा काय झाले? माझी उत्सुकता वाढली होती."तर हा हा म्हणता ओढा पाण्यानं भरुन गेला, पाणी पुलावरुन वाहायला लागलं! इकडं बाळ्या बोंबलतच होता. आणि आता ऐक काय झालं हां.."त्यांनी मला बजावलं. तबलजी समेवर येताच तबल्यावर जशी थाप ठोकतो, त्या स्टाईलमधे ते म्हणाले."जसा आम्ही पुल ओलांडला, तसं पाणी झपदिशी खाली गेलं!"इथे ते माझी प्रतिक्रिया आजमावण्यासाठी क्षणभर थांबले."आणि हे अगदी खराय बरं का! प्रत्यक्ष्य डोळ्यांनी पाहिलेलं!""बापरे!" मी उद्गारलो."आता या पुलावरुन जाताना मला भीती वाटेल!" मी आपलं असंच म्हणालो."अरे हे काहीच नाही. मला अजुन भीतीदायक अनुभव आलेत." मला गारद केल्याच्या आनंदात ते म्हणाले."तुला अजुन एक किस्सा सांगतो" माझ्या खांद्याला दाबत ते म्हणाले."घे अजुन घे ना" त्यांनी पातेल्याकडे हात केला. मामींनी चपळाईनं पुढं होऊन पळीभर रस्सा माझ्या वाटीत ओतला."तर त्याचं असं झालेलं..." मामांनी सुरुवात केली."मी आणि आपल्या जनुमामाचा सदा आम्ही दोघं बारामतीवरुन येत होतो""तुला जनुमामाचा सदा महिती असेलच ना?""नाही" त्यांच्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला मी ओळखतो असा बहुतेक मामांचा समज झालेला दिसत होता."अरे आपली गजा

परी आणि भुताची कथा

एक माणूस एकदा एका अरण्यात फिरता फिरता वाट चुकला. भटकत भटकत तो अरण्याच्या खूप आत पोहचला. अरण्याचा हा भाग एकदम निर्जन होता. तिथे एका परी अन एका भूताचे राज्य होते. दोघेही आपापल्या राज्याच्या वेशीवर बसून शिळोप्याच्या गप्पा करीत होते.वाट चुकलेल्या माणसाला बघून परी म्हणाली अरे मी ओळखते ह्याला! लहान पणी मी ह्याच्या स्वप्नात जायचे, हा खूप खूप आनंदून जायचा मला बघून! मग आम्ही खूप खूप खेळायचो, नाचायचो खूप खूप भटकायचो. हा तर अगदी हट्टच करायचा तू जाउ नकोस म्हणून. मला आठवतंय सगळं त्यालाही आठवेल! तो ओळखेल मला नक्कीच! मला वाटतं माझ्याच शोधात आलाय तो इथे. मी त्याचं अगदी जोरदार स्वागत करील. त्याला माझ्या राज्यात नेईल, त्याला छान सगळीकडे फिरवील. मी त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करील. आम्ही खूप खूप मज्जा करू.भूत म्हणले, मी ही ओळखतो ह्याला. मी ही जायचो ह्याच्या लहानपणी ह्याच्या स्वप्नात. तेव्हा हा खूप घाबरायचा मला, अगदी थरथर कापायचा, मला बघून ह्याला भर थंडीतही दरदरून घाम फुटायचा ह्याला कधीकधी तर दचकून झोपेतून उठायचा, मग पांघरुण ओढून गुडुप झोपायचा प्रयत्न करायचा.परी म्हणाली, तुझं असंच रे तूला सगळेच घाबरतात, तो काही केल्या तुझ्या जवळ यायचा नाही.भूत म्हणाले, नाही! तसं होणारच नाही. तो माझ्या राज्यातून पुढे जाऊच शकणार नाही .परी म्हणाली, नाही! नाही तो नक्कीच येईल तू बघच. त्याला खूप खूप आवडायची रे मी!भूत म्हणाले, ती फार जुनी गोष्टं तेव्हा तो फार लहान होता. आता तर त्याला तू आठवणार ही नाहीस.परी म्हणाली, आठवेल आठवेल त्याला सगळं! किती किती गोड होतं ते सगळं! ते रम्य बालपण! त्या गोष्टीविसरतो काय कुणी?भूत म्हणाले, तुला वाईट वाटेल पण तो तुला विसरलाय हे नक्की. आता तर तो तुझ्यावर विश्वास सुद्धा ठेवणार नाही.परी म्हणाली, मग तो तुझ्या राज्यात काय म्हणून येईल तो तुलाही विसरला असणार ना? तो काय म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवील?भूत म्हणले, तसं होत नाही कधीच तो मला नक्कीच ओळखेल तो मला विसरणार नाही कधीच.परी म्हणाली, तो मला ही विसरणार नाही, बघ तू आता कशी आठवण करून देते त्याला तू बघच. माझा निर्माता आहे विश्वास. विश्वास कधीच खोटा ठरायचा नाही! तू बघच तो मला नक्कीच ओळखेल, लावतोस पैज!भूत म्हणाले, पैज नको लाउस कारण मला चांगला अनुभव आहे तू नक्कीच हारशील.परी म्हणाली, नाही माझा विश्वास कधीच खोटा ठरणार नाही, तूच घाबरतो आहेस पराभवाला! म्हणून टाळतो आहेस ना?भूत म्हणाले, ठीक आहे बघ प्रयत्न करून.परी म्हणाली, सांग मी जिंकली तर काय देशील?भूत हसले आणि म्हणले, जर तू जिंकलीस तर मी तुला माझे पूर्ण राज्य देऊन टाकील, अन मी कायमचा ह्या जगातून निघुन जाईल.बघ हं! परी म्हणाली, वेळेवर शब्द फिरवायचा नाही.नाही फिरवणार! भूत म्हणाले.मग परी ने विश्वासाची आराधना केली, अन तिने गोड आवाजात गाणे म्हणणे सुरु केले, पक्षी ही आपल्या गोड गळ्याने तिला सुरात साथ देऊ लागले. परी ने मग हळू हळू नाचायला सुरवात केली. वारा मंद मंद शीळ वाजवून तिला साथ देऊ लागला, पानांची सळसळ सुरु झाली. आनंदानी झाडे अन वेली ही डोलू लागली. फुलांनी आपल्या पाकळ्या पसरायला सुरवात केली.वातावरण प्रसन्न होऊ लागले माणूस ही आनंदी होऊ लागला. परी ने मग मनातल्या मनात दुप्पट जोमानी विश्वासाची आळवणी केली, आता सूर्याने वनावर आपली किरणे फेकली त्या किरणात माणसाला परी चे सोनेरी केस तिचे सुंदर डोळे दिसू लागले, हळूहळू त्याला तीची पूर्ण आकृती दिसू लागली. परी आनंदून गेली तिने त्याच्या स्वागता साठी हात पसरले.माणसाला स्वता:च्या डोळ्या वर विश्वासच बसेना. भ! भ! भूत!! त्याच्या तोंडातून कसेबसे शब्द बाहेर पडले.अचानक आकाशात ढग भरून येऊ लागले, विजांचा कडकडाट सुरु झाला, सूर्य ढगांच्या आड लपून गेला, अंधारून येऊ लागले, सोसाट्याचा वारा सुरु झाला, झाडे कडाकडा मोडून पडू लागली, माणूस भयानी घामाघूम झाला, त्याची दातखीळ बसली अन तो कोसळून गतप्राण झाला.सर्व काही शांत झाले. परी धावतच माणसा जवळ गेली अन रडू लागली. ती भूताला म्हणाली, तूच जिंकलास. नेहमी तूच का रे जिंकतोस. मला सगळे का विसरून जातात?भूत ही खिन्न झाले, त्यानी परीच्या खांद्या वर थोपटले. ते म्हणाले हे असंच होतं.नेहमीच! तुझा निर्माता आहे विश्वास, माझा निर्माता आहे भय. विश्वास काय अन भय काय हे ह्याच्याच डोक्यातून जन्म घेतात. हाच आपला मुळ निर्माता आहे, आपले वेगळे अस्तित्व नाही. पण!पण! पण काय? परी म्हणाली.हा मोठा झाला होता. अन जसा जसा माणूस मोठा होत जातो ना तसा तसा त्याचा विश्वास कमी होत जातो, पण! पण भय मात्र वाढत जातं. म्हणूनच मी जिंकतो. पण तू उदास नको होऊस, माझा शब्द अजून कायम आहे जेव्हा ही विश्वासाचा विजय होईल ना त्या दिवशी मी खरंच हे जग नेहमी साठी सोडून जाईल. भूत म्हणले.(समाप्त)

मंगळवार, २८ जुलै, २०१५

अमानवीय जखिण


.मी तेव्हा 13 वर्षाचा होतो . आणि गावा वरुन आत्ये भावच्या लग्नाची पत्रिका नुकतीच आली होती.मे महिना होता. आणि शाळेला भरपूर सुट्ट्या सुधा होत्या . त्यात गावाला जाण म्हणजे आनंदाची पर्वणीच माझ्यासाठी. एकदाचे आम्ही गावाला येऊन पोहचलो . लग्न असल्यामुळे सगळी भावंड अगोदरच गावाला आली होती. आणि तेव्हा मी सगळ्यात लहान असल्यामुळे माझे लाड होत असत......
आत्याच गाव चिपळूण पासून सुमारे 12 की. मी अंतरावर आहे गावाच नाव केळने. गाव डोंगराच्या मधे असल्याने निसर्गाने जणू सगळी सुंदरता त्यात भरली होती. आत्ता मैं स्टोरी ला सुरवात करतो.......
तो लग्नाच्या आधीचा म्हणजे हळदिचा दिवस होता घरात लग्न असल्यामुळे सगळे वेगवेगळ्या कामात व्यस्त होते. सगळ्या भावंडानी काम वाटून घेतली होती. मी आणि माझी ताई रेखा आमच्या दोघांवर पाणी भरण्याचे काम सोपवण्यात आले. पाणी भरण्या साठी विहरीवर जाव लागत असे. ती विहीर घरा पासून 5 मिनटांच्या अंतरावर होती. आणि ती विहीर जमिनीला लागून होती म्हणजे तिच्या बाजूला सुरक्षा कड नव्हती . त्या मुळे लहान मूलाना सहसा तिथे जाऊ दिले जात नव्हते. विहीर तशी खोल नव्हती 4 ते 5 फुट पाणी असेल त्यात.आणि विहरीच्या बाजूला एक मोठे चिंचेचे झाड होते..
तर झाल अस की रेखा ताई आणि मी दोघ निघालो पाणी भरण्यासाठी दुपारचे 12. ते 12.30 वाजले असतील काही वेळात पोहचलो विहरी जवळ तेवा तिथे कोणीच नव्हते. आमच्या गप्पा चालू होत्या ताई विहरीतून पाणी काढून हंडा भरत होती आणि मी त्या विहरीत वाकून बघत होतो. विहरीत समोरच्या चिंचेची पान पडत होती. सगळ वातावरण एकदम शांत होत . तेवढ्यात ताई म्हणाली तुला माहीत आहे का कल्पेश या झाडावर जखिण राहते अस म्हणतात. ते ऐकून मी ताई ला चिडवत म्हणालो राहते ना मग बोलव मी नाही घाबरत कोणाला . तर मस्करी म्हणून ताई जोरात बोलली ए जखिणी ये आणि धर आमच्या कल्पेश ला. ती हे बोलताच आम्ही दोघे पण हसायला लागलो आणि ताई ने भरलेला एक हंडा माझ्या डोक्यावर दिला आणि म्हणाली हो पुढे आणि ती तिचा हंडा उचलू लागली तसा मी घरच्या दिशेने वळलो. मी 4 ते 5 पावल टाकली असतील अचानक धाड असा मोठा आवाज झाला.. अचानक अंगातून एक शीरशिरी उठली . मी मागे वळून पहिले तर ताई कुठेच दिसत नव्हती. मी घाबरलो पाय थरथारू लागले पण ताई चा विचार करून हिंमत केली आणि विहारी जवळ गेलो आणि खाली डोकवून पहिले. आणि जे पहिले ते कधीच विसरू शकत नाही
ताई विहरित उभी होती पूर्ण ओले केस डोळे लाल लाल झलेले होते आणि एक विचित्र हास्य तिच्या तोंडावर होते आणि सारखी मान वाकडी तीकडी करत होती तेव्हा
आणि अचानक तिने मला आवाज दिला की ये खाली ये मी तुला घ्यायला आली आहे . हे ऐकून माझी टरकलि . अंगात जेवढी शक्ति होती तेवढी एकवाटून मी घरच्या दिशेने पाळायला लागलो. धापा टाकत अंगणात येऊन पडलो माझी ती गत बघून सगळे माझ्या दिशेने धावत आले मला उचलले आणि पाणी पाजले मी बोललो ताई बावडीत पडली आहे हे ऐकून मामा , आणि दोन चार मोठी मंडळी विहरीच्या दिशेने धावले. अर्ध्या तासाने ते सगळे लोक ताई ला पकडून घेऊन आले . ती जोर जोरात किंचाळत होती. ओरडत होती. की मला तो पाहिजे ते ऐकून मी अजुन घाबरलो मोठ्या मंडळीनी लगेच गावातील एका मंत्रीक बाबाना बोलावले . आणि ताई ला त्यांच्या समोर बसवले काही मंत्र उच्चारण केले आणि ताई ला विचारले कोण आहेस तू आणि का या मुलीच्या मागे लागली आहेस. तेव्हा ती जोरजोरात हसायला लागली आणि म्हणाली मी चिंचेची शेंद्री जखिण आहे . हिने मला बोलवल आहे. त्या मुलाला घेऊन जाण्यासाठी आता मी या दोघाना पण सोबत घेऊन जाणार. तेव्हा सगळेच घाबरले मग मंत्रिकने काही अजुन मंत्र म्हटले आणि तिला विचारल या मुलांकडून चुक झाली त्याना क्षमा कर आणि त्या बदल्यात तुला हव ते देतो . तेव्हा ती म्हणाली नाही मला अजुन काहीच नको मला हे दोघ हवे आहेत माझी मस्करी करतात याना मी घेऊन जाणार तेव्हा मंत्रिकाने काही मंत्र म्हटला आणि त्याच्या पिशवीतून एक रखेची पुडी बाहेर काढली आणि ती तिच्या कपाळाला लावली तशी ती रडू लागली तिला त्रास होऊ लागला मंत्रीक पुन्हा म्हणाला जातेस की नाही तेव्हा ती म्हणाली मला हिरवी साडी आणि मांसाहाराच जेवण पाहिजे तरच मी याना सोडेन . मंत्रिकने ते कबूल केल द्यायच आणि मामाना एक साडी आणि मटनाच ताट घेऊन बावडी जवळ ठेवायला संगितल ते सर्व होई पर्यंत मंत्रिकच मंत्र बोलन आणि ताई च माझया कडे रागाने बघन चालूच राहील . मामा सगळ्या विधी करून घरी आला तसा मंत्रिकने ताई कडे बघितल आणि ओरडला जेया आता तुझी मागणी पूर्ण झाली आहे. आणि परत तो अंगारा काही मंत्र बोलून तिच्या आणि माझ्या कपाळाला लावला तसा ताई शांत झाली आणि पडली.......
मंत्रिकने एक दोरा आमच्या हाताला बांधला आणि निघून गेला. सगळ शांत झाले थोड्या वेळाने रेखा ताई उठली आणि म्हणाली अरे आपण इथे कसे आपण तर पाणी आणायला गेलो होतो ना ......... तेव्हा मामा बोलले हो पण तुला चक्कर आली म्हणून तुला घरी आणून झोपवले पाणी भरून झाल आता .... तिकडे जायाच नाही दुसर्या दिवशी लग्न आटोपल तसेच आम्ही मुंबई ची गाडी पकडली कारण अजुन काही विपरीत होऊ नये म्हणून आणि त्या दिवसाला आज १३ वर्ष झाली मी परत कधीच अत्याच्या गावाला गेलो नाही ...."
समाप्त